पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखाण्यात स्फोट; मृतांचा आकडा 22 वर

चंदीगड : पंजाबमधील गुरुदासपूर येथील बटाला येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. पाहटे 4 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. अनेकजण मलब्याखाली अडकले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झालं असून जखमींना वाचण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्फोट झाला तिथेच रहिवासी वस्ती असून काही घरांनाही स्फोटाचा फटका बसल्याचं समजतंय. .

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-