बीड | एखाद्या भागाचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर त्या भागात दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा असणं गरजेचं असतं. रस्ते, विज, रेल्वे, शिक्षणाच्या सुविधा यांच्या माध्यमातून विकास होत असतो.
महाराष्ट्राच्या भौगौलिक नकाशावर कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेला बीड जिल्हा आता हळूहळू कात टाकायला लागला आहे. बीड जिल्याचं नेतृत्व काही वर्षांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे करत होते.
गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अनेक विकासाची काम झाली आहेत. पण त्यांना बीड जिल्ह्यात रेल्वे आणता आली नाही याची कायम खंत वाटत होती. आता त्यांचं स्वप्न साकार झालं आहे.
बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा नगर-आष्टी रेल्वेमार्गाचं काम पुर्ण झालं आहे. बुधवारी नगरहून सोलापूरवाडी येथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आणि बीडवासियांच अनेक वर्षांचं स्वप्न पुर्ण झालं आहे.
उद्या बीडमध्ये एक साकार स्वप्न धावणार. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली, असं भाविनक ट्विट राज्याच्या माजी मंत्री आणि बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या लढाईत साथ दिल्याबद्दल माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचंही आभार मानलं आहे.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या खात्यावर आणखी एक विक्रम असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड जिल्यातून प्रीतम मुंडे या दोन वेळेस खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे अह्यात असताना बीड शहराला रेल्वेनं जोडण्यात यावं यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते. आता रेल्वे सुरू झाल्यानंतर सर्वांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली आहे.
दरम्यान, रेल्वेच्या माध्यमातून बीड जिल्याच्या नागरिकांचा विकास होण्यास मदत होणार आहे. बीड रेल्वेनं इतर शहरांशी जोडलं गेल्यानं बीडच्या विकासात भर पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य
बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस
नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका
‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा