…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

बीड | बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा रद्द केला आहे.  गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच त्या अभिवादन करणार आहेत.

3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच मानवंदना देण्याचा निर्णय घेतला आहे.

परळीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे त्या दिवशी गोपीनाथगडावर जाणार आहेत. समर्थकांनाही त्यांनी आधीच घरी राहून स्मृतिदिन साजरा करण्याची सूचना दिली आहे.

गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क

-परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

-सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!

-“अमोल कोल्हेसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत”