“स्वत: बीडमध्ये पवार साहेब जरी उभे राहिले तरी आता कमळाशिवाय पर्याय नाही”

नाशिक |  भाजपचा महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. पंकजा मुंडे यांनी याच सभेत केलेल्या भाषणात राष्ट्रवादीवर आणि शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली.

शरद पवार यांनी बुधवारी बीडमध्ये विधानसभेसाठीच्या पाच उमेदवारांची नावांची घोषणा केली. यावरच त्यांनी निशाणा साधत स्वत: बीडमध्ये पवार साहेब जरी उभे राहिले तरी आता कमळाशिवाय पर्याय नाही, असं पंकजा म्हणाल्या.

माझी राष्ट्रवादीला भिती वाटते… म्हणूनच पवारांनी बीडला येऊन उमेदवार जाहीर केले, अशी टीका त्यांनी  त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने पाच वर्षात उत्तम कामगिरी केलीये. म्हणून आम्हाला भिती नाहीये. पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार येणार आहे, असं पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, पवारांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये परळीमधून धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-