Top news महाराष्ट्र मुंबई

‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

मुंबई  |  कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. मात्र भाजपच्या रणांगणातून नाराज नेत्या पंकजा मुंडे या गायब झाल्या आहेत, अशी चर्चा आहे. काल त्यांनी भाजपच्या आंदोलनात सहभाग घेतलेला दिसत नाही. किंबहुना त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर दिसत नाहीयेत.

पक्षावर नाराज असलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी ते काल परवा पर्यंत भाजपवर आसूड ओढणारे एकनाथ खडसे यांच्या हातात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’चे पोस्टर दिसले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका केली. परंतू या आंदोलनात मात्र पंकजा मुंडे कुठेच दिसल्या नाहीत. त्यांनी आंदोलनात न घेतलेला सहभाग यातून बऱ्याच गोष्टी सूचित होतात.

पंकजा मुंडे यांच्याबरोबर त्यांच्या भगिणी प्रीतम मुंडे यांनी देखील भाजपच्या आंदोलनात सहभागा घेतला नव्हता, असं चित्र समोर आलं आहे. कारण दोन्ही बहिणींचा एकही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाहीये किंवा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर फोटो टाकलेला नाहीये.

दुसरीकडे पंकजा मुंडे यांना नुकतंच विधानपरिषदेचं तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे त्या पक्षावर नाराज आहे. याचसंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक गुप्त बैठक देखील घेतली होती. मात्र पंकजा यांची नाराजी दूर झालेली दिसत नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

-संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका

-बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

-नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

-सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी