बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं आहे. मराठवाड्यातील नेहमीच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी, समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणावं. त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार आणि मांजरा उपखोऱ्यात वळविणेबाबतचे निवदेन पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

भाग 1- जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा जलदगती प्रवाही कलवा 70 किमी काढणे.

भाग 2- मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पाचे स्थैर्यकरण करणेसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळविणे.

मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली आणि मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.

प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6700 कोटी खर्च अपेक्षित असून, या योजनेचे सर्वेक्षण तात्काळ करण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केली.

 

महत्वाच्या बातम्या-

-वडिल 9 वेळा काँग्रेसचे खासदार, ‘या’ नेत्याची आमदार मुलगी करणार शिवसेनेत प्रवेश???

-देशहिताच्या आड धर्म येता कामा नये!;’एक देश, एक संविधान’ भूमिकेचं ठाकरेंनी केलं स्वागत

-इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!

-“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे झकलण्याची गरज नाही”

-“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”