मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात काम करताना दिसावेत अशी माझी इच्छा आहे, अशी भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. खडसेंवर अन्याय झालाय का? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलं. त्या बीबीसी मराठीशी बोलत होत्या.
एकनाथ खडसे यांच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीने जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला अन् खडसेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. नंतर मुख्यमंत्र्यांनी झोटिंग समिती नेमली आणि चौकशी लावली. खडसेंना झोटिंग समितीने क्लीनचिट दिली. पण परत मुख्यमंत्र्यांनी मात्र खडसेंना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही.
नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. मात्र त्यांच्याबाबतीतले सगळे निर्णय निकाली निघावेत आणि त्यांनी पुढच्या मंत्रिमंडळात सोबत काम करावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बुधवारी महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेला खडसे नाशकात उपस्थित होते. सगळ्या ज्युनिअर नेत्यांना भाषणाची संधी मिळाली. मात्र सिनिअर खडसेंना भाषणाची संधी मिळाली नाही. कार्यक्रमस्थळी याची एकच चर्चा होती.
दरम्यान, खडसेंना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या-
सरकारला चिमटा काढणाऱ्या व्यंगचित्रावर संजय राऊत म्हणतात, ‘व्वा क्या बात है!’ https://t.co/scEdIVZMeI @rautsanjay61 @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
‘सिटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार काँग्रेस उमेदवारी देणार; आज 50 नावांची घोषणा होणार https://t.co/tY9Gwne1aY @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
धाकधूक वाढली… भाजप विद्यमान 25 आमदारांचं तिकीट कापणार?? https://t.co/LCFPCA3lC9 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019