औरंगाबाद महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांनी ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची लायकी काढली

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही, असं भाजप नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीडच्या धारुरमध्ये स्थानिक कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जोरदार लक्ष्य केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या संकल्प मेळाव्याची त्यांनी खिल्ली उडवली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपल्यासमोर उभे राहायची हिंमत आणि लायकी नाही. त्यामुळे पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो. राष्ट्रवादीचे नेते इथं उभं रहायला घाबरतात. पराभूत होण्यासाठी कोण उभं राहणार?- पंकजा मुंडे

विजयी संकल्प यात्रेवर त्यांनी हल्ला चढवला. कितीही तयारी करा. मी कोणलाही घाबरत नाही. आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार, असा दावा देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

IMPIMP