“राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

अदमदनगर | सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते, असं म्हणत माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचं दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहित नाही, मात्र राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगलं होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहू नये, तर असं कार्य करावं की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, राजकारणामध्ये ज्यांनी जे जोडे घातले आहेत, त्यांनी त्याच जोड्याला शोभेल असं वागावं. आम्ही विरोधी पक्षाच्या जोड्यामध्ये आहोत. तर आम्ही विरोधी पक्षासारख खंबीर वागले पाहिजे. त्याचबरोबर आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही काय केले आणि काय केले नाही हे ठासून सांगितले पाहिजे, असंही त्या म्हणाल्यात.

सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशात जोरदार राजकारण सुरू आहे. विशेष:हा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद

 “अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश 

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा