“सामान्य माणसाला अच्छे दिन यावे, महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय”

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्य बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत देशात महागाई नसावी हेच नरेंद्र मोदींचं ध्येय असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय सचिव म्हणून मला असं वाटतं की या महागाईवर तोडगा निघायला हवा. महागाई नसली पाहिजे. सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असंच पंतप्रधानांचं ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

निवडणुका लढण्यामागे भाजपचा एक हातखंडा आहे. मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तिथे प्रचाराला जाणार आहे, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा वर जात होते. 50 टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा असताना आरक्षण रद्द झालं. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप आहे, असंही पंकजा मुडेंनी सांगितलं.

महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला हवे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा पडणार नाही- रामदास आठवले

‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’; ‘या’ नेत्याने उघड केलं गुपित

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल- छगन भुजबळ

‘आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही’; यशोमती ठाकूर अन् रवी राणांमध्ये खडाजंगी

राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे- नाना पटोले