बुलडाणा | गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.
एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असंही त्या म्हणाल्यात.
पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट केलं आहे.
पंकजा मुंडे आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलेलं आहे.
मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनींची ही खदखद प्रकर्षाने समोर आली होती.
त्यावेळी राज्यात मोठं अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यभारातून मुंडे भगिनी समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा यांनी दिल्लीला वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मोदींच्या डोक्यातील विचार शरद पवारांना कळतात..’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा मोदींना टोमणा
पुढच्या वर्षी IPL खेळणार का?; ‘थाला धोनी’ म्हणतो…
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ