मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांनी राजकारण तापलं आहे. रोज विविध मुद्द्यांनी गदारोळ पहायला मिळत आहे.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रोजच कलगितुरा रंगलेला पहायला मिळतो. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे मुंबईत आयोजीत केलेल्या ‘लोकमत टाॅक’ या शोमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांचा एक चांगला गुण आणि त्यांना एक सल्ला देण्यास सांगितलं.
देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत, असं पंकजा मुंडेनी म्हटलं आहे.
या क्रार्यक्रमात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का?, असं विचारण्यात आलं, यावेळी त्यांनी नाही असं म्हटलं.
सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर
Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले ‘मी माझे कपडे विकून लोकांना…’
‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर
“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष”