‘हे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकार’; पंकजा मुंडेंचा घणाघात

मुंबई | राजकीय वर्तुळात नेहमीच कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत असतात. आता ओबीसीच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत ओबीसीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता ओबीसीच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं अजूनपर्यंत ओबीसींच्या मुद्द्यावर तोडगा काढलेला नाही. अजूनही ओबीसींचा मुद्दा कारणी लावला नाही. अद्यापही इम्पिरिअल डेचा गोळा केला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यामागेही सरकारचाच हात आहे, असं म्हणत पंकडा मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी पंकडा मुंडे यांनी सरकारला इम्पिरिकल डेटा आणि सेन्ससमधला फरक तरी कळतो का? असा प्रश्न केला आहे. सरकारनं 15 महिन्यात डेटा गोळा केला नाही. अद्यापही कालावधी गेलेला नाही. त्यामुळे अजूनही इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी गोळा द्यायला पाहिजे.

पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, सरकारला मोठमोठ्या नेत्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे. मात्र ओबीसींच्या इम्पिरिअल डेटासाठी वेळ नाहीये.

पत्रकार परिषदेत ओबीसींच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यालाही हात घातला. यावरुवनही त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. अद्यापही राज्य सरकारकडून यावर काही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे प्रवाशांचीही कोंडी होत आहे.

दरम्यान, आता महविकास आघाडी सरकार ओबीसीच्या मुद्द्यावरुन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या  – 

  नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; क्रांती रेडकरचे ‘ते’ कथित चॅट केले शेअर

  “एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा