भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंबरोबरच तब्बल 72 विविध नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

खडसेंनंतर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू झाल्या आहेत. शिवसेनेकडून पंकजा मुंडे यांना अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत, असंही बोललं जात आहे. मात्र, या सर्व चर्चांना आता पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे.

आंबेजोगाईच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर घणाघात केला आहे.

मी शिवसेना पक्षात जाणार की आणखी दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार, अशी माझ्याविषयी अनेकजण विनाकारण भविष्यवाणी करत आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीनं मला भरभरून दिलं आहे. माझे निर्णय घेण्यास मी स्वतः खंबीर आहे. गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे.  यामुळे माझी चिंता सर्वांनी सोडा, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वत्र कोरोनानं थैमान घातलं होतं. कोरोना कालावधीमध्ये मी मुंबई शहरात अडकले होते. कोरोनाकाळात मी जर घराच्या बाहेर पडले असते तर लोकांनी माझ्याभोवती गराडा घातला असता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. जनतेच्या आरोग्याची मला काळजी असल्यानं मी घराबाहेर पडली नाही, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

कोरोनाकाळात मी घराबाहेर पडले नाही याचा काही लोकांनी गैरअर्थ काढला. पंकजा मुंडे घराबाहेर पडत नाहीत, अशा अफवा पसरवल्या. मात्र, कोरोना महामारीच्या काळात खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि अक्षय मुंदडा यांनी प्रत्येक कोव्हीड सेंटरला भेट दिली आहे, असंही पंकज मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह इतर 72 नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!

कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या गायकाचं नि.धन, मोदींनीही शोक व्यक्त केला

मिर्झापूरचा दुसरा सिझन सापडला वादात; ‘या’ कारणामुळे बंदी येण्याची शक्यता!

एकनाथ खडसे यांचा धक्कादायक खुलासा! चंद्रकांत पाटलांविषयी सांगितलं ‘ते’ सत्य