धनंजय, हे खपवून घेतलं जाणार नाही; पंकजा मुंडे भडकल्या

बीड |  सरपंच परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षाला राष्ट्रवादीच्या म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पांडुरंग नागरगोजे असं मारहाण झालेल्या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचं काम का करतो? म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना लाथबुक्क्यांनी तुडवलं, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्य कार्यकर्त्यांला मारहाण झाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं … हे खपवून घेतलं जाणार नाही, असं ट्वीट करत त्यांनी धनंजय मुंडे यांना ताकीद दिली आहे.

सत्ता नाही तरी पुण्याई आहे आणि हिंमत ही आहे …सामाजिक न्याय करा अन्याय चालत नाही इथेअसं ट्वीट करत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना मिळालेल्या खात्यावरून आणि आजच्या झालेल्या मारहाणीवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला आता धनंजय मुंडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-