‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी पक्षाचे नेते रुग्णालयात पोहोचत आहे. त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेही रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

ब्रिज कँडी रुग्णालयात असलेल्या धनंजय मुंडे यांची भेट पंकजा मुंडे यांनी नुकतीच घेतली. कट्टर राजकीय शत्रू असलेल्या या बहिण भावांमध्ये यावेळी कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती समोर आलीये.

फार दगदग करू नकोस, काळजी घे, असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी यावेळी भाऊ धनंजय मुंडे यांनी दिल्याचं कळतंय.

दरम्यान, धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण झटका वैगेरे नाही. डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

…अन् मॅच सुरू असताना टॉपलेस होऊन मैदानात घुसली महिला, पाहा व्हिडीओ 

“राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात” 

“दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसलं”