बीड : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पहिल्यांदाच व्यक्त झाल्या आहेत. त्यांनी यासंबंधी फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनातील भावना जनतेसमोर ठेवल्या आहेत. तसेच 12 डिसेंबर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी गोपीनाथ गडावर जमन्याचं आवाहन केलं आहे.
निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.‘आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले, असं त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. ‘ताई आम्हाला भेटायला वेळ द्या’, ..’ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या’..किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?, अशी भावूक पोस्ट त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
नितेश राणेंची महाविकास आघाडीवर बोचरी टीका! – https://t.co/rdOqvz1YNd @NiteshNRane @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत; एमआयएमच्या सदस्यांचा ठाकरेंना शब्द – https://t.co/j2oeo3HOPZ @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
राहुल बजाज यांची अमित शहा यांच्यावर जोरदार टीका – https://t.co/HezsRzV1pW @Rahul_Bajaj @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019