महाराष्ट्र Top news मुंबई

ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल!

Parag Agrawal
Photo Credit- Twitter/ Parag Agrawal

मुंबई | ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला संधी देण्यात आली आहे. जॅक डोरसी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. तर जॅक डोरसी हे 2022 पर्यंत कंपनीच्या बोर्डावर कायम असतील.

अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत विशेष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम पाहिलेलं आहे.

2017 मध्ये अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ म्हणून काम पाहिलं आहे. याआधी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्ये काम केलेलं आहे.

अग्रवाल यांनी त्यांचं बिटेकचं शिक्षण आयआयटी मुंबईमधून पूर्ण केलेलं आहे. कॉम्यूटर सायन्स अँड इंजिनिअररिंगमध्ये ते निष्णात आहेत. जॅक डोरसी यांच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले आहेत. तर डोरसी यांनी आपल्या राजीनाम्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे.

मला पारगवर पूर्ण विश्वास आहे. त्याची मागील दहा वर्षातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यातील कौशल्य आणि प्रतिभेचा माझ्यावर कायमच प्रभाव राहिलेला आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचंही नाव या यादीत समाविष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका! 

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…” 

“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही”