…या कारणांमुळे परळीतील मराठ्यांनी आंदोलन स्थगित केलं!

परळीमध्ये मराठा समाजाने सुरु केलेलं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य न झाल्यास 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरातून या निर्णयावर पडसाद उमटत आहेत. 

परळीतील मराठ्यांनी आंदोलन का मागे घेतलं?

-उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी घेण्यात आली. आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मराठा तरुणांनी आत्महत्या करु नयेत, असं आवाहन देखील न्यायालयाने केलं. 

-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे. पुढील सुनावणीत मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट मागवू, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

-मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मिळायला किमान 3 महिन्यांचा अवधी लागणार आहे. हा अहवाल आल्याशिवाय मराठा आरक्षणावर न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही. 

-मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर पावलं उचलू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. 

-मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला वेळ देण्यात आला आहे.

-30 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्यास परळीतील मराठ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.