मुंबई | शीना बोरा हत्याकांड प्रकरणाने देशभरात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. यानंतर याप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर आले. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आज शीनाबरोबर ज्याचा साखरपुडा झाला त्या राहुल मुखर्जी याचा महत्वपूर्ण जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात आला.
शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती 2012 साली सर्वात अगोदर आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांना देण्यात आली होती.
शीना बोराचा मित्र राहुल मुखर्जी याने कोर्टात जबाब नोंदवला. या वेळी त्याने ही माहिती न्यायालयाला दिली आहे.
तक्रार नोंदवण्यास परमबीर सिंह यांनी खास मदत केली नाही. 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात शीना बोराचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी परमबीर सिंह हे कोकण विभागाचे महासंचालक होते, असं राहुलने सांगितलंय.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ आमदाराने शिवसेनेचं टेंशन वाढवलं; पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर
“देश नही झुकने दुंगा विसरलात का?, भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा”
खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह
“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “