मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचं मानलं जात आहे.
परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केल्यापासून ते चंदीगडमध्ये राहत असून चंदीगडमध्ये सीबीआयच्या चौकशीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला होता.
मुंबईचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दबाव आणला. मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना बडतर्फ करा, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना देशमुख यांच्या गैरव्यवहारांबद्दल माहिती दिली होती. मात्र त्यांना त्याची आधीपासूनच जाणीव होती, असा दावाही परमबीर यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर काही लोकांना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुकीच्या कृत्यांची माहिती दिली होती, ज्याबद्दल त्या सर्वांना आधीच माहिती होती, असं ते म्हणाले.
देशमुख आणि त्यांचे दोन माजी सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सिंह यांच्या वक्तव्याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार
अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार
केंद्रीय मंत्री स्मती इराणी यांना कोरोनाची लागण