मनोरंजन

समुद्रकिनारी हॉट फोटोशूट; या फोटोमुळे परिणीता चोप्रा होतेय ट्रोल

सोशल मीडियावर अभिनेत्री आणि अभिनेते यांचा थेट अॅक्सेस लोकांना मिळायला लागला आहे. त्यामुळे सिनेमांविषयी काही भलंबुरं सांगणं असो की त्यांच्या वर्तनाविषयी बोलणं असं लोक सरळ त्यांना सांगत असतात. फेसबुकच्या तुलनेत इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हा अॅक्सेस खूपच चांगला आहे. फेसबुकवर सेलिब्रेटी लोकांच्या कमेंट सहसा वाचत नाहीत, मात्र ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ते लोकांच्या कमेंट वाचत असतात तर कधी कधी त्यांना रिप्लाय देखील देत असतात. अमिताभ बच्चन पासून ते मोठमोठ्या सेलिब्रेटींना याचा चांगलाच फटका बसला आहे, कारण लोक फक्त तारिफच करतात असं नाही तर ते ट्रोल देखील करतात. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री परिणीती चोप्राला आला आहे. 

काय झालं परिणीती चोप्रासोबत?

अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतंच ‘नमस्ते इंग्लंड’ या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं आहे. शुटींग पूर्ण झाल्यामुळे मजेत असलेली परिणीती सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. मालदीवमधील आपल्या एन्जॉयमेंटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या स्वीम सूटमध्ये परिणीती खूपच सेक्सी आणि स्लिम दिसत आहे. तरीही तिला ट्रोल करण्यात आले. लोकांनी तिची हुर्यो उडवली आहे. काही लोकांनी तिच्या तोकड्या कपड्यांवरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. 

कोणता आहे परिणीताचा तो फोटो-

Parineeti Chopra is in Maldives

हाच तो फोटो आहे ज्यामुळे परिणीता चोप्राला त्रास सहन करावा लागतो. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या फोटोखाली असंख्य कमेंट आल्या आहेत. अनेकजण तिला या कपड्यांवरुन खडे बोल सुनावताना दिसत आहेत. काहीजणांना मात्र तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. परिणीता खूपच सेक्सी दिसत असल्याचं त्यांनी कमेंटमध्ये आवर्जुन नमूद केलं आहे. 

IMPIMP