परळीत गेल्या 21 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातून या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मात्र परळीतील मराठ्यांनी आज संध्याकाळी यासंदर्भात घोषणा केली.
मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या लेखी स्वरुपात मान्य झाल्या आहेत. या सर्व मुद्द्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. तसा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी परळीत मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर राज्यात आंदोलन पेटलं होतं. अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.