पुणे महाराष्ट्र

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

पुणे |  विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने विविध राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेणे चालू केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे नेते अजित पवार इच्छुुकांच्या मुलाखती घेत आहेत. या महत्वपूर्ण प्रक्रियेत पार्थ पवार आपला सहभाग नोंदवतील. 

अजित पवार मुलाखती घेत असताना पार्थ पवारदेखील त्यांच्यासोबत बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असतील. पार्थ पवार विधानसभेच्या तोंडावर महत्वाची भूमिका बजावतील.

पार्थ यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी दारूण पराभव केला. त्यानंतर त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात जाणं टाळलं. पार्थ पवार पराभवाने खचले, अशी चर्चा चालू असतानाच त्यांनी पक्षात महत्वाची जबाबदारी उचलायचं ठरवलंय.

येत्या रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अजित पवार, विद्या चव्हाण आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडणार आहे.

दरम्यान, विधानसभेसाठी स्वपक्षातील नेत्यांना थोपावण्याचं मोठं आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पवार घराण्याला पराभव दाखवणाऱ्या शिवसेना खासदाराचं मोदींकडून कौतुक!

-“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???

-“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”

-“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”

IMPIMP