मुंबई| महाराष्ट्रात सर्व शाळा, महाविद्यालयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यी आपापल्या घरी निघाले आहेत, पण प्रवाशांनी प्रवासासाठी सार्वजनिक सुविधांना नाकारलं असल्याचं चित्र दिसत आहे.
सरकारनं गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळण्याचं आवाहन केलं असल्यामुळं मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्या निम्याहून कमी भरून जाताना दिसत आहेत. प्रवासी खासगी वाहनांना प्राधान्य देत आहेत. यासगळ्या परिस्थितीचा फटका सार्वजनिक वाहनांना बसला आहे एवढं मात्र निश्चित.
मुंबईत कोरोनामुळं पहिला बळी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. मृत् झालेली व्यक्ती 64 वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रूग्णाची संख्या आता 39वर पोहोचली आहे तर देशात 125 कोरोनबाधित रूग्ण आढळले असल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळं भितीचं वातावरण आहे. केंद्र तसंच राज्यसरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-“राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही”
-महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अन् सुबोध भावेला दिसतोय यामधूनही आशेचा किरण
-“मध्य प्रदेशात जसा राजकीय भुकंप झाला तसाच राजकीय भुकंप महाराष्ट्रात देखील होईल”
-मास्कवर शिवाजी महाराजांची प्रतिमा, मास्क न घेण्याचं शिवप्रेमींचं आवाहन
-कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका बक्षिस…; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन