फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं

मुंबई | डॉ. पतंगराव कदम महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं नाव… महसूल, सहकार, वन, मदत आणि पुनर्वसन अशी महत्वाची खाती सांभाळत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भरीव कामगिरी करणारा नेता.

सांगली जिल्ह्यातील सोनसळ या खेड्यातील शेतकऱ्याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने पतंगराव कदमांचं पदवीपर्यंतचं शिक्षण सातारा जिल्ह्यात झालं. दहावी उत्तीर्ण होणारे ते त्यांच्या गावातील पहिले विद्यार्थी होते. शिक्षक पदविकेसाठी त्यांनी पुणे गाठलं. पुढे ते द्विपदवीधर झाले.

कॉलेजचं शिक्षण पतंगरावांनी रयतमध्ये कमवा आणि शिकवा येजनेअतर्गत घेतलं. यानंतर एक चांगला मुलगा म्हणून पतंगराव कदम यंशवंतराव चव्हाणांच्या संपर्कात आले. पुण्यात शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत काही दिवस रुजू झाले. पण काहीतरी मोठं आणि वेगळं करायचं मनात असल्याने त्यांचं त्यात मन लागत नव्हतं.

पुढे वयाच्या 18 व्या वर्षी पतंगराव कदमांनी विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक पतंगराव कदम होते. या दरम्यान त्यांचा संपर्क यंशवंतराव मोहिते यांच्याशी आला. यानंतर यंशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालीच पतंगराव कदमांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं.

1968 मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. यानंतर एसटी महामंडळाच्या संचालक पदासाठी मोहितेंना पहिलं नाव सुचलं ते पतंगराव कदमांचं. तेव्हा पतंगराव फक्त 23 वर्षांचे होते. त्यावेळी या पदावर मोठे नेते असायचे. मात्र या तरूण मुलाला संधी देताना अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पतंगराव कदमांना विरोध होईल म्हणून मोहितेंनी त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या वसंतदादांची परवानगी घ्यायचं ठरवलं. दादा तुमच्या जिल्ह्यातील तरूण मुलगा आहे. त्याला एस.टी बोर्डावर घ्यायचा माझा विचार आहे. तुमची परवानही हवी होती, असं यशवंतराव मोहितेंनी वसंतदादांना सांगितलं. यावर भाऊ तुम्ही म्हणताय तर तो नक्की चांगला मुलगा असेल, असं वसंतदादा म्हणाले.

यशवंतराव मोहिते आणि वसंतराव चव्हाणांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर पतंगराव कदमांचं नाव वसंतरावांच्या कानावर गेलं. मात्र एकाच जिल्ह्यात असून वसंतरावांचा पतंगराव कदमांशी कधी संपर्क आला नव्हता. यशवंतराव चव्हाण आणि वसंतरावांच्या पाठिंब्याने मिळालेल्या संधीचं सोनं पतंगराव कदमांनी केलं. यानंतर मात्री त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एअर इंडियानंतर ‘या’ कंपनीला विकणार 

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा…- देवेंद्र फडणवीस 

भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील