घरात आयसोलेशन असणाऱ्या रूग्णांनी लवकर बरं होण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, वाचा सविस्तर

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर ताण आल्याचं दिसत आहे. तरी त्यातील काही रूग्णांना कमी प्रमाणात लक्षण असल्याने त्यांना घरताच आयसोलेशन केलं जात आहे. अशा रूग्णांनी घरात राहून स्वत:ची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

80टक्के रूग्ण घरात आयसोलेशनमध्ये राहून बरे होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशावेळी रूग्णांनी काही नियमांचे पालन केलं पाहिजे. जेणेकरून ते रूग्ण लवकर रिकव्हर होऊ शकतील. यासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, हे सफदरजंग हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे तज्ञ डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले आहेत.

  • घरात राहणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णानी आपल्या खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवाव्यात. जेणेकरून खोलीत हवा आणि सूर्यप्रकाश येईल. त्या
  • दोन ते तीन वेळा घरात आयसोलेशन असलेल्या रूग्णाची ताप तपासणी करावी. मात्र हे लक्षात ठेवावं की, ताप 100 डिग्रीपेक्षा जास्त नसावा.
  • तसेच ऑक्सिमीटरच्या साहय्याने रूग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीही वारंवार चेक करत रहावी. हे चेक करत असताना हे लक्षात ठेवावं की, ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यापेक्षा कमी नसावी.
  • रूग्णानी आपलं मास्क दर पाच ते सहा तासांनी नियमित बदलावं.
  • रूग्णांची भांडी, टॉवेल, बेडशीट आणि कपडे बाजूला ठेवावीत. जेणेकरून घरातील इतर सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही.
  • रूग्णांंनी आपला हात सतत सॅनिटाईज केला पाहिजे.
  • त्याचप्रमाणे याकाळात रूग्णांनी धुम्रपान आणि मद्यपान करू नये.
  • भरपूर पाणी पित राहिले पाहिजे, जेणेकरून शरिरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही.
  • रूग्णांनी भरपूर प्रमाणात झोप घेतली पाहिजे.

तसेच, घरी आयसोलेशन असलेल्या रूग्णांना ताप जास्त येत असल्यास, श्वास घेण्यात अडचण जाणवत असल्यास. त्याचप्रमाणे रूग्णांना जास्त प्रमाणात डोकेदुखी जाणवत असेल, तर त्वरित रुग्णालयात जा. आपल्या इच्छेनूसार किंवा मनानी कोणतेही उपचार करू नका.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! कोरोना लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करा…

‘सलमान खान आमच्यासाठी देवदूतच!’ ‘या’…

कोरोना लस घेण्यासाठी महिला पोहचली चक्क नवरीच्या वेशभूषेत,…

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप,…

‘द पांड्या स्वॅग’! हार्दिक आणि कृणालनं केला…