मुंबई | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्ष या निवडणुकीत प्रचाराला उतरले आहेत. मात्र, राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निवडणुकीत मात्र एकत्र येणार नसल्याचे संकेत आता मिळत आहेत.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत जाणार नाही असं वक्तव्य कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं. यामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादीचं टेंशन वाढलं आहे.
पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, तीनही पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळं आम्ही आता कोणाच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही.
कोण मजबूत आहे आणि कोण कमजोर आहे हे राज्यातील जनता ठरवेल. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे काँग्रेस विचारधारेची आहेत. काँग्रेस त्याच ताकदीने जनतेसमोर जाणार आहे, असं ते म्हणालेत.
पुणे, पिंपरी महानगर पालिका भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाने लाच घेणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. या दोन्ही महानगर पालिका काँग्रेसच जिंकेल. कोणी प्रस्ताव दिल्यास त्यावर आम्ही विचार आणि चर्चा करू असे ते म्हणाले.
दरम्यान, मी तेव्हा गावगुंडाबद्दल बोललो होतो. तो पुढे आला. देशाच्या पंतप्रधानांच्या पदाची गरीमा संपवण्याचं काम भाजपाने केले आहे. भाजपाकडून रस्त्यावर गुंडागर्दी केली गेली. माझ्या प्रतिमेची जाळपोळ केली, विटंबना केली. ही परंपरा, वृत्ती आजच्या भाजपाची नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्री बाई फुले यांना काय त्रास दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काय त्रास दिला या सगळ्यांच्या इतिहासात नोंदी आहेत, असं नाना पटोल यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
कोरोनातून बरं झालेल्या व्यक्तीवर झाला भयंकर परिणाम; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
‘किरीट सोमय्यांना मानसिक धक्का बसलाय’, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार