पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट

मुंबई | सध्या ऐतिहासिक कथानकावर आधरित ‘पावनखिंड’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रसिद्धी मिळवली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाने 1,530 शोसह चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘पावनखिंड’ चित्रपट फेटे, नऊवारी साडी, मराठमोळा पोशाख आणि तुताऱ्यांच्या आवाजात प्रेक्षक पाहत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

पावनखिंड या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गमतीदार पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सगळीकडे या पोस्टबद्दल चर्चा होत आहेत.

दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. आणि आता ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, असं आवाहन या पोस्टमध्ये करण्यात येत आहे.

पावनखिंड चित्रपट पाहिल्याचं तिकीट घेऊन या आणि मिसळवर 20 टक्के सवलत मिळवा अशी ऑफर ठेवण्यात आली आहे. पावनखिंड चित्रपट जोपर्यंत थिअटरमध्ये आहे तोपर्यंत मिसळवर सवलत देण्यात आली आहे. असं चिन्मयने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पावनखिंड हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत चांगलीच कमाई या चित्रपटाने केली आहे. पहिल्याच आठवड्यात 6 कोटी रूपयांची रक्कम या चित्रपटाने कमावली आहे.

दरम्यान, या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाल्याने या चित्रपटाचे शो वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रविवारी याचे 1900 शोज करण्यात आले. तसेच चिन्मयने केलेल्या पोस्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; ‘या’ गोष्टी महागणार 

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध; जगासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे 

 मोठी बातमी! युक्रेनमध्ये सैन्य कारवाई करण्याची पुतिन यांची घोषणा

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ