निर्भया प्रकरण: आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्यानंतर त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेची याचिका दाखल केली होती. ती याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली आहे.

आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात यावी अशी विनंती त्यानं या याचिकेतून न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने आरोपी पवनची याचिका फेटाळल्यानंतर त्याने 2 मार्च रोजी राष्ट्रपतींकडे दया यचिका दाखल केली.

3 मार्च रोजी सर्व आरोपींना सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र आरोपी पवनने केलेल्या दयेची याचिका प्रलंबित असल्याने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. आरोपींची फाशीची शिक्षा पुन्हा एकदा टळली. आता पुढचे आदेश येईपर्यंत आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रपतींनी पवनची याचिका फेटाळल्याने चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे. आता पुढील चौथे डेथ वॉरंट कधी जारी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोबाईल वापरणाऱ्यांनो जरा सावधान, कारण…

-‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश

-अहो, हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?; विनायक मेटेंचा सरकारला सवाल

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी