‘पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, सर्व काही सुरळीत होईल’; ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास

अहमदनगर | राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर आणि सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणावरून भाजपला अनुकूल भूमिका घेतली होती. यामुळे पवार कुटुंबातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना महत्वाच विधान केलं आहे.

पार्थ पवार माझा एकदम जवळचा मित्र आहे. पार्थ अतिशय समंजस देखील आहे. पवार कुटुंबात चाललेल्या वादावरून मी देखील पार्थशी बोलणार आहे. त्यामुळे सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास राजेश टोपे यांनी दाखवला आहे.

पवार कुटुंबातील सर्वजन विविध क्षेत्रात काम करतात. पवार कुटुंबातील सर्वचजण एकीने काम करतात. छोट्या मोठ्या कारणावरून कोणत्या गोष्टी घडल्या तर त्या तिथल्या तिथे मिटवण्याची व्यवस्था पवार कुटुंबात आहे. पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांनी अजित पवार यांना पार्थ पवार मुद्द्यावर प्रश्न विचारला होता. यावेळी अजित पवारांनी मला माझ काम करुद्या, असं म्हणत या मुद्द्यावर अधिकचं भाष्य करणं टाळलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

तिरडी ना खांदेकरी! मुलांनी सायकलवरून काढली बापाची अंतयात्रा

सुशांतचा मृत्यू कशामुळे झाला?; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

पार्थ पवारांनंतर आता रोहित पवारांनी केली ही मागणी; पुन्हा चर्चेला उधाण

पार्थ पवार काही भाजपमध्ये येत नाही आणि आम्हीपण काही घेत नाही- गिरीश बापट

भारतीय टीममधील माजी क्रिकेटर आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील ‘या’ मंत्र्याची जीवनयात्रा अखेर थांबली