‘कॉंग्रेस नेत्यासोबत वाद झाल्यानं पवार संतापून बैठकीतून निघून गेले अन्…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने आता वर्ष पूर्ण केलं आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मिळून स्थापण केलेल्या तीन चाकी सरकारने एक वर्ष यशस्वीरीत्या राज्याचा कारभार सांभाळला आहे. सरकारच्या वर्षपूर्ती निम्मित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून संजय राऊत यांनी म्हविकास आघाडी सरकारच्या स्थापनेचा घटनाक्रम मांडला आहे.

यामध्ये संजय राऊत यांनी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. अजित पवार यांनी पहाटे शपथविधी कसा उरकला? यापासून ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंतच्या गोष्टी संजय राऊतांनी यामध्ये लिहिल्या आहेत. संजय राऊत यांनी यामध्ये सत्ता स्थापन होण्यापूर्वीच्या एका बैठकी दरम्यानचा किस्सा देखील सांगितला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी मला तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?, असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी 170 हा आकडा सांगितल्यानंतर माझी खिल्ली उडवण्यात आली होती. तोपर्यंत कॉंग्रेसचा महाविकास आघाडीच्या सरकारला स्पष्ट होकार नव्हता.

मात्र, अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे यांचे लक्ष फक्त सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळतंय याकडेच लागून होते.

राऊत पुढे म्हणाले की, नेहरू सेंटरमधील 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खारगे यांच्या एका वक्तव्याने यामध्ये ठिणगी टाकली. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये, अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. त्यानंतर शरद पवार व खरगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पहिले होते.

ते त्राग्याने टेबलवरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल पटेल आणि मी धावत गेलो. त्याच बैठकीच्या सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, हे पवारांनी सुचविले होते. मात्र, खरगे पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला.

तसेच अजित पवार आणि फडणवीस यांच्या तीन दिवसाच्या सरकारविषयी बोलताना राऊत म्हणाले की, त्याच बैठकीत अजित पवार बराच काळ त्यांच्या मोबाईल वरून खाली मान घालून चॅटिंग करत होते.

शरद पवारांनंतर ते ही काही वेळाने बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे दर्शन थेट राजभवनात शपथविधी सोहळ्यात झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘निक रात्री मला झोपू देत नाही अन् रात्री उठून माझ्यासोबत…’; प्रियांका चोप्राचा पतीविषयी मोठा खुलासा!

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुनावाला यांची कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा!

प्रेग्नन्सीनंतर अनुष्का चित्रपट सृष्टीला अलविदा करणार? अनुष्का शर्माचा मोठा खुलासा!

‘पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंचा मोदींना इशारा

काय सांगता! महिनाभरात तब्बल इतक्या हजारांनी सोनं उतरलं