मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी गराडा घालत आंदोलन केलं. आंदोलकांनी पवार कुटुंबीयांना घेरलं आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली.
सध्या राज्यात याच प्रकरणावरून चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी सिल्वर ओकवर भेट देत शरद पवार यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तर राष्ट्रवादीने या प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.
काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले, अशी खोचक टीका निलेश राणेंनी केली आहे.
आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ, असल्याचं राणेंनी म्हटलंय. त्यासोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा, असा सल्ला देखील निलेश राणे यांनी यावेळी शरद पवार यांना दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
थोडक्यात बातम्या –
शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!
‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”
ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांच्या सिल्वर ओकवर चप्पल फेक
राज ठाकरेंच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर, म्हणाले…
“दादा, कुछ तो गडबड है…”; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा