मोठी बातमी! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा पवारांचा पहिलाच खानदेश दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

मुंबई | एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला नुकसान सहन करावं लागणार अशा चर्चा सध्या चालू आहेत. खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. मात्र, शरद पवार यांचा हा दौरा कॅन्सल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार यांचा हा पहिलाच खानदेश दौरा होता. पण हा दौरा सोमवारी अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचा हा दौरा काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी रोहिणी खडसे यांना तातडीने जळगाव मधील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यानं एकनाथ खडसे यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा कॅन्सल झाल्याची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्यावेळी भाजपमधील काही आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करतील असंही बोललं जात होतं. मात्र, हा कार्यक्रम देखील आता पुढे ढकलण्यात आला आहे.

दरम्यान, खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खानदेश दौरा करत असल्यानं यावेळी खडसे आपलं शक्ती प्रदर्शन करतील असंही बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर काल भाजप नेते प्रसाद लाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा प्रसाद लाड यांनी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.

शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे दौरे करत आलेले आहेत. त्यांचा हा दौराही काही नवीन नाही. शरद पवार यांच्या तो आवडीचा विषय आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यात दौरा केल्यानं इथे भारतीय जनता पार्टी कमकुवत होईल असं मानण्याचं कारण नाही, असं लाड यांनी यावेळी म्हटलं होतं.

तसेच उत्तर महाराष्ट्रात भाजपला व नरेंद्र मोदींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजप पक्ष स्वतः समर्थ आहे. आमच्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी करत आहोत. एकनाथ खडसे यांचा उलटा प्रवास आता सुरू झाला आहे. स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करुद्या, असं म्हणत लाड यांनी यावेळी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता.

तसेच खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचं काहीही नुकसान होणार नाही. खडसे इतक्या ताकदीचे नेते होते तर स्वतःच्या मुलीला निवडून का आणू शकले नाहीत?, असा सवालही प्रसाद लाड यांनी यावेळी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतलं आहे’; प्रसाद लाड यांचा मोठा गौप्यस्फोट!

टायगर श्रॉफच्या बहिणीचा ‘त्या’ घटनेबद्दल मोठा खुलासा! स्वतः सोशल मीडियावर म्हणाली…

सुशांतच्या मृ.त्युनंतर देखील अंकिताने केलं ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल

धक्कादायक! पतीच्या मृ.त्युनंतर ‘या’ गावात पत्नीच्या शरीराचा हा भाग का.पला जातो

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता! शिवसेना नेत्यांचा ‘तो’ दावा खोटा?