आता लस नाही गोळी घ्या! कोरोनावर उपचारासाठी ‘या’ कंपनीची गोळी लवकरच बाजारात

मुंबई | कोरोनाने मागील दोन वर्षात हाहाकार माजवला होता. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशात लाॅकडाऊन लावावं लागलं होतं. कोरोनाच्या लाटेत अनेक जणांचे प्राण देखील गेले आहेत. (FDA has approved Pfizer’s pill for the treatment of corona)

भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटेमुळे मोठं नुकसान झाल्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला होता. सध्या देखील भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.

लसीकरण कोरोनावरील एकमेव प्रभावी इलाज मानला जात होता. अशातच आता कोरोनावरील उपचारासाठी लवकरच बाजारात लस नाही तर गोळी येणार आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. FDA ने कोरोनावरील उपचारासाठी फायझर या कंपनीच्या गोळीला मान्यता दिली आहे.

फायझरच्या या गोळीला Paxlovid हे नाव देण्यात आलं होतं. 12 वर्षावरील व्यक्तींना जोखीम असेल, त्या रूग्णांसाठी या गोळीला मान्यता देण्यात आली आहे.

2200 रूग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर यामुळे 88 टक्के लोकांना मृत्यूचा धोका कमी असल्याचं दिसून आलं होतं. अमेरिकेसह आता युरोपियन युनियनने देखील या औषधाला मान्यता देण्यात आली आहे.

कोरोनाची लक्षणं दिसू लागली तर की या 5 गोळ्या दिल्या जातात. दर 12 तासाने एक गोळी यामध्ये घेयची असते. डाॅक्टरांच्या सल्लानुसार गोळी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आता फायझरची ही गोळी लवकर बाजारात येणार असल्याने आता डाॅक्टर देखील समाधान व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे

रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा 

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता” 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ