नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. नुकतंच अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला आहे. पायल घोषनं इंडस्ट्रीतील एका मोठ्या दिग्दर्शकावर केलेल्या आ.रोपानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
2014 साली अनुराग कश्यप यांनी पायलवर ज.बरदस्ती केली असल्याचं पायलनं सांगितलं आहे. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत. पायाल घोषनं वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये २२ सप्टेंबरला अनुराग विरोधात एफ.आय.आर दाखल केली आहे.
वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यपवर अद्याप कोणतीही का.रवाई केली नाही. यामुळे पायलं रविवारी पुन्हा वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. जर पोलिसांनी अनुराग विरोधात का.रवाई केली नाही तर मी उपोषण करेल, असा इशारा पायलनं दिला आहे. पोलीस स्टेशन बाहेर पायलनं प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.
अनुराग कश्यप एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. यामुळे अनुराग विरुध्द प्राथमिक त.क्रार दाखल केल्यानंतरही वर्सोवा पोलिसांनी अद्याप त्याला अ.टक केलं नाही. जर मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी उ.पोषण करणार आहे, असं पायलनं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तसेच पायलनं यावेळी त.पास अधिकारी पोलीस ठाण्यात नसल्याचंही सांगितलं आहे. पोलीस ठाण्यात मी गेले तेव्हा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त.पास अधिकारी पोलीस ठाण्यात नव्हते यामुळे मला सोमवारी पुन्हा बोलावण्यात आलं आहे, असंही पायालनं यावेळी म्हटलं आहे.
रविवारी पोलीस स्टेशनमध्ये पायल घोष बरोबर तिचे वकील नितीन सातपुते सुद्धा आले होते. पोलिसांनी पायलनं दाखल केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी. पोलिसांनी तपासात वेग आणत अनुराग कश्यपवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच पायलं घोषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पायलनं तिच्या सुरक्षेबद्दल शंका उपस्थित केली होती. या पोस्ट सोबत पायलनं ‘मी. टू’ आणि ‘नॉट गोईंग डाऊन’ हे दोन हॅशटॅग वापरत अनुरागवर निशाणा साधला आहे.
अनुराग कश्यप वि.रोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला त्या घटनेसंदर्भात मुलाखत दिली होती. ही माहिती देण्यापूर्वी मी अनुरागची परवानगी घ्यायला हवी होती हे मला माहित आहे. इंडिया मी जर छताला ल.टकलेली दिसली तर लक्षात ठेवा ती माझी आ.त्मह.त्या नसेल. या लोकांकडे माझी नै.राश्य आणि मेडि.केशनची कहाणी तयार असेल. #MeToo #NotGoingDown, असं पायलंनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’
एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…
‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!
कंगना राणावत गजा.आड जाणार? अखेर कंगना विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल