‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली

मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला होता. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत. पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा दाखल केला होता.

पायलनं गु.न्हा दाखल केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी अनुरागला समन्स बजावत 1 ऑक्टोबरला वर्सोवा पोलीस ठाण्यात त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुराग कश्यप वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी तब्बल 8 तास त्याची चौकशी केली. रात्री साडेसातच्या सुमारास अनुराग कश्यप पोलीस ठाण्यातून बाहेर पडला.

चौकशी दरम्यान अनुरागनं पायल घोषने केलेले सर्व आरो.प खोटे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच पायलनं ज्यावेळी तिचा छ.ळ झाला आहे असं म्हटलंय त्यावेळी आपण भारतात नव्हतोच असंही अनुरागनं म्हटलं आहे. पोलीस चौकशी दरम्यान अनुरागनं पायल घोषचे सर्व आ.रोप बिन बुडाचे असल्याचं म्हटलं आहे. अनुरागच्या वकील प्रियंका खिमानी यांनी यासंबंधित एक स्टेटमेंट जारी केलं आहे.

पायल घोषनं 2013 मध्ये तिचा लैं.गिक छ.ळ झाल्याचा आ.रोप अनुरागवर केला आहे. मात्र, 2013 मध्ये अनुराग कश्यप श्रीलंकेत त्याच्या एका सिनेमाचं शुटिंग करत होता, असं अनुरागनं पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलं आहे. तसेच अनुरागनं पु.रावे म्हणून पोलिसांना काही कागदपत्रे सुद्धा सादर केली आहेत, असं प्रियंका यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. प्रियंका यांनी सादर केलेल्या स्टेटमेंटनंतर पायल घोषनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मिस्टर अनुराग कश्यप यांनी पोलिसांना दिलेली सर्व माहिती खोटी आहे. सत्य समोर आणण्यासाठी माझे वकील अनुरागची ना.र्को एनालिसीस, ला.य डिटेक्टर आणि पॉ.लिग्राफ टेस्ट करण्याचा अर्ज देतील. सत्य सर्वांसमोर येण्यासाठी आणि मला न्याय मिळण्यासाठी हा अर्ज आज पोलीस ठाण्यात दिला जाईल, असं पायलनं ट्वीट करत म्हटलं आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबरला अनुराग विरोधात पायलनं एफ.आय.आर. दाखल करूनही पोलिसांनी अनुराग विरुद्ध कोणतीच कारवाई केली नव्हती यामुळे पायल 27 सप्टेंबरला पुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात गेली होती.

जर पोलिसांनी अनुराग विरोधात का.रवाई केली नाही तर मी उपोषण करेल, असा इशारा पायलनं पोलिसांना दिला होता. यावेळी पोलीस स्टेशन बाहेर पायलनं प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता.

अनुराग कश्यप एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. यामुळे अनुराग विरुध्द प्राथमिक त.क्रार दाखल केल्यानंतरही वर्सोवा पोलिसांनी अद्याप त्याला अ.टक केलं नाही. जर मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी उ.पोषण करणार आहे, असं पायलनं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

तसेच रविवारी पोलीस स्टेशनमध्ये पायल घोष बरोबर तिचे वकील नितीन सातपुते सुद्धा आले होते. पोलिसांनी पायलनं दाखल केलेल्या त.क्रारीची दखल घ्यावी. पोलिसांनी तपासात वेग आणत अनुराग कश्यपवर लवकरात लवकर का.रवाई करावी, अशी मागणी सातपुते यांनी यावेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस

‘रिया शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती’; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या

अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…