पुणे | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी अजितत पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे हशा पिकल्याचं पहायला मिळालं.
अजित पवार सभेत अनेकांना चिमटे काढत असतात. काहींची तर समोरासमोर खेचतात. अशातच महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यावर अजित पवारांनी हसवे फवारे फुंकले.
विद्याधर अनास्कर यांनी सहकारात राजकारण नसलं पाहिजं असं सांगितलं. हे मात्र अनास्कर यांनी बरोबर ओळखलं आहे, असं अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तरी अनास्कर आहेतच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनास्कर आहेतच, शरद पवार यांच्याकडे विभाग आला तरी अनास्कर आहेतच, असं असलं पाहिजे, असंही अजितदादा म्हणाले.
कोणाचंही सरकार आलं, तरी एवढी विश्वासार्हता असली पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी करताच भर सभेत एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. बँकेचं काम करत असताना मी अनास्करांना नेहमी सांगत असतो, मी सांगितलेलं योग्य नसेल तर ऐकायचं नाही, असा खुलासा देखील अजितदादांनी यावेळी केला.
मध्यंतरी देशातील नागरी सहकारी बँकामध्ये 220 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली. मात्र वास्तविक तशी परिस्थिती नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. 100 टक्क्यांमध्ये काढायचं झालं तर पाव टक्का देखील ती रक्कम नव्हती. मी याचं समर्थन करत नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“बदाम खाऊन मला अक्कल आली की…”; अभिनेता अमेय वाघची पोस्ट चर्चेत
“शरद पवार भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, हकालपट्टी झाल्यावर…”
ही दोस्ती तुटायची नाय! LIVE सामन्यात पोलार्डने घेतलं ड्वेन ब्राव्होचं चुंबन; पाहा व्हिडीओ