‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका!

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे देशात खळबळ माजली आहे. जगाची चिंता वाढवणारा ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट (new Corona varient Omicron) आढळल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

केंद्र सरकाकडून राज्यांना निर्देश देण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने देखील खबरदारीचा इशारा (The World Health Organization also issued a warning) दिला आहे. अशातच आता ओमिक्रॉनच्या धोक्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या या नविन ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान वाढताना जाणवतं. आरटीपीसीआर चाचणीवरून देखील या व्हेरिएंटला ओळखलं जाऊ शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीला कोरोनाच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. त्या व्यक्तीला नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका जास्त असल्याचं देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. अशा व्यक्तींना सहजतेने संसर्ग होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय.

सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रोन व्हायरस आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे.

अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेत हा विषाणू आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. तरीही या विषाणुचा प्रसार रोखता आला नाही, या वाढलेल्या यादीवरून त्याच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज येतो.

ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या देशामधून आतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा मोठं संकट आलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…” 

“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही” 

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं 

“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार”