फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात मुंबई उच्च (Mumbai High Court) न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. फाल्गुनी पाठक या दांडियासाठी सुप्रसिद्ध आहेत.

कांदिवली पश्चिम (Kandivali West) भागात प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर (Pramod Mahajan Ground) नवरात्रीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आयोजित कार्यक्रमात दांडियाची गाणी गाण्यासाठी पाठक यांना निमंत्रण होते.

त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सदर मैदानाचे व्यावसायीकरण रोखण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याबरोबर या क्रीडांगणावर अशा सर्व कार्यक्रमांना नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचे राज्यसरकारला आदेश देण्यात यावेत अशी मागणी देखील या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप (Vinayak Yashwant Sanap) यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित ठिकाण विकास आराखड्यात खेळाचे मैदान म्हणून निश्चित केेले असल्याचे म्हंटले आहे.

फाल्गुनी पाठक यांच्या या ठिकाणी होणार असलेल्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत 800 ते 4200 रुपये असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मैदाच्या वापरातून पैसा कमावण्याचे काम सुरु असल्याचे याचिकाकर्त्याने म्हंटले आहे.

त्यामुळे याच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे मैदान सर्वांसाठी सतत खुले असावे, असे याचिकेत म्हंटले आहे. तसेच कोणाकडूनही त्याचे व्यावसायिकीकरण केले जाऊ नये, असे याचिकाकर्ते म्हणत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

दसरा मेळाव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मोठे वक्तव्य

मोठी बातमी; अभिनेता केआरके संघात प्रवेश करणार!

“काही आमदार हात पाय तोडण्याची भाषा करतात, अरे काय तुझ्या बापाच्या”

गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!

…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं