पेट्रोल-डिझेलच्या दरांनी मोडली सामान्यांची कंबर! जाणून घ्या ताजे दर

मुंबई | देशात सध्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात.

देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेली पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तर इंधनाच्या दरांनी सर्व विक्रम मोडले आहेत.

पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार देशात आज देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण नागरिकांच्या खिशाला झळ मात्र पोहोचत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर आहेत.

6 एप्रिलपर्यंत इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 106 डॉलरच्या आसपास आहे. त्याच्या किमती वाढल्या तर कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…