पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

गुरूवार म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 103.63 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 112.44 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 106.89 रूपये आहे आणि डिझेलचा दर 95.62 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”

वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये- नितीन गडकरी

‘साहेब…आता मलाच मुख्यमंत्री करा’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे