नवी दिल्ली : अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलदरात दररोज वाढ होत आहे. 17 सप्टेंबरपासून इंधन दरात सलग सहा दिवस वाढ झाली आहे. रविवारी देशभरात पेट्रोलचे दर 27 पैशांनी तर डिझेलचे दर 18 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.
सौदी अरेबियातील अरामको या सर्वात मोठ्या इंधन शुद्धिकरण प्रकल्पावर 14 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची झळ भारतातील इंधनदरांना बसण्यास सुरवात झाली आहे.
मुंबईमध्ये डिझेलदराने प्रतिलिटर 70.01 रुपयांची नोंद केली आहे. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचे व डिझेलचे दर अनुक्रमे 73.62 आणि 66.74 रुपये नोंदवण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात एकूण 6 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 1.59 आणि 1.31 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.
भारताच्या एकूण इंधनगरजेपैकी 83 टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सौदीकडून भारताला दरमहा 20 लाख टन इंधनाचा तसेच, 2 लाख टन एलपीजीची पुरवठा केला जातो. चालू महिन्यात भारताला आत्तार्यंत 12 ते 13 लाख टन इंधनाची आयात झाली असून उर्वरीत आयतही विनाअडथळा केली जाईल, अशी हमी सौदीने दिल्याचं समजतंय.
दरम्यान, ब्रेण्ट क्रूड ऑईलचे दर सध्या प्रतिबॅलर 65 अमेरिकी डॉलरच्या आसपास आहेत. सौदीकडून होणारा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हे दर चढेच राहण्याची शक्यता असल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
दगाबाजी करू नका नाहीतर….; चंद्रकांत खैरेंचा भाजपला इशाराhttps://t.co/U3tF9IwZHl @ChandrakantKMP @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदंबरम यांना भेटायला तिहार तुरूंगात! https://t.co/HPxHXfE4Iq
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
दहशतवादाविरोधात लढताना डोनाल्ड ट्रम्पही मजबुतीने आपल्यासोबत- नरेंद्र मोदी – https://t.co/45CziLfONB @narendramodi @realDonaldTrump
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019