पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; आज ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं

मुंबई | मागील जवळपास आठवड्याभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली आहे.

सोमवारीही तेलाच्या किमतीत वाढ होऊन आठवड्याची सुरुवात झाली आहे. महानगरांसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 पैशांनी वाढ केली आहे.

दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलनेही 95 रुपये प्रतिलिटरचा टप्पा पार केला आहे. मुंबईत पेट्रोल 119 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे, तर डिझेल 103 रुपयांनी महाग होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो’; गडकरींनी स्पष्टच सांगितलं 

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी 

  ‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल 

  “शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”

  “देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात