मुंबई | रशिया युक्रेन युद्ध गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असून याचे आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठे पडसाद उमटत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाने गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे.
आज दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरात इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा आहेच.
दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर आहे तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर.
मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरांत आजही पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे.मागील काही दिवसांपूर्वी 80-80 पैशांच्या वाढीसह पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत होती.
पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल 9224992249 वर SMS करुनही जाणून घेऊ शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपण ज्या त्या शहराचा कोड लिहून 92249 92249 या नंबरवर पाठवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार! समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण
‘शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित….’; राऊतांचे भाजपला खडेबोल
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”
राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
अतरंगी कपडे घालणाऱ्या राखी सावंतवर गुन्हा दाखल; झालं असं की…