नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगामुळे सगळं जनजीवनच विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता सगळं पूर्वपदावर येत आहे.
कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. कोरोना काळात सगळ्याच गोष्टींच्या किंमतीत वाढ पहायला मिळाली. महागाईनं तर उच्चांकच गाठल्याचं चित्र होतं.
केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. या कपातीनंतर काही शहरांमध्ये इंधनाचे दर 100 रुपयांपेक्षा कमी झाल्याचं पहायला मिळालं.
अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी रोजी यावर्षासाठीचा अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. या बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल दर कमी होण्याची आशा होती. मात्र असं काहीही झालं नाही.
अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे नागिरकांची नाराजी पहायला मिळत आहे.
दिल्लीत पेट्रोलचा 95.41 रुपये आहे तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही घटण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं.
आज इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील जवळपास एक महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी
धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण
दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी
टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा
शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ