मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.
यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.
त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. तर आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे.
रविवार म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 102.52 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.73 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.84 रूपये आहे आणि डिझेलचा दर 94.57 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या-
“टोपे साहेब, विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करा”
“उद्धव ठाकरे म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही”
सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचे दर
भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश
आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ