पेट्रोल-डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला, झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. तर आज दसऱ्याच्या मुहूर्तावरही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे.

शुक्रवार म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनूसार पेट्रोल 34 पैशे तर डिझेलमध्ये 38 पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.09 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 101.38 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.03 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.12 रूपये आहे आणि डिझेलचा दर 93.92 रुपये आहे.

हे दर आज दिवसभर लागू राहणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये अशीच वाढ होत राहीली तर लवकरच यांच्या किंमती 120 टप्पा गाठतील, असं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

“…तर शिवसेनेचे 56 आमदार त्यावेळी तुमच्यासोबत दिसले असते”

“चित्र वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं”

गांजा आणि तंबाखूमधील फरक एनसीबीला कळतो की नाही?- नवाब मलिक

तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा- प्रीतम मुंडे