‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात केंद्राचा मोठा निर्णय’; बेकायदेशीर ठरवत पुढील…

नवी दिल्ली | केरळमध्ये स्थापन झालेली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया (Popular Front of India) ही इस्लामिक संघटना आहे. गेले अनेक दिवस देशविरोधी कारवाया करण्याच्या आरोपावर पीएफआयच्या (PFI) अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

अनेक राज्यातून आणि शहरांतून फ्रंटच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली गेली होती. आता केंद्र सरकाराने दूरदर्शी निर्णय घेत फ्रंटवर मोठी कारवाई केली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्याच्यासोबत संलग्न संघटनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयच्या स्थापनेत असणारे अनेक लोक स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (Students Islamic Movement of India) म्हणजे सीमीचे (SIMI) सदस्य असल्याची माहिती दिली आहे.

तसेच या संघटनेचा संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश या संघटनेसोबत असल्याची माहिती दिली. या दोनीही बंदी घालण्यात आलेल्या संघटना आहे, असे केंद्राने म्हंटले.

रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊंसील, नॅशनल कॉनफ्रजडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फॅण्ट, ज्युनियर फॅण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अ‌ॅण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवर देखील बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

गेले अनेक दिवस केंद्र सरकार या संघटनांविरोधात मोठी कारवाई करत आहे. त्यांच्या अनेक सदस्यांना अटक देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांत छापेमारी करण्यात आली होती.

मंगळवारी दिवसभरात तब्बल 170 लोकांना अटक करण्यात आली आहे. आज पहाटे या संघटना बेकायदेशीर असल्याचे केंद्रातून जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने ही मोठी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला! फडणवीस म्हणाले…

कोणत्या अधिकारात तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात? न्यायालयाने शिंदे यांच्या वकिलाला फटकारले

“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार” – घटनातज्ज्ञ उल्हास बापट

संजय राऊत यांची आज सुनावणी पार पडली; महत्वाची माहिती समोर

‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’