शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो

मुंबई | बाॅलिवूड आणि राजकारण यांच्यातील संबंध अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. नेहमीच दोन्ही क्षेत्रातली मैत्री चर्चेचा विषय ठरत असते.

राज्यातील राजकारणातील मोठा चेहरा म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर सध्या जयचीच चर्चा सुुरु आहे.

जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जय पवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जय पवार आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

अद्याप हा फोटो कधीचा आहे याविषयी काही समोर आलं नाही. मात्र या दोघांच्या फोटोनं सोशल मीडियावर तुफान राडा घातला आहे.

दरम्यान, जय पवार हे सध्या बारामतीतील राजकारणात विशेष सक्रीय आहेत. सोशल मीडियावरही ते विशेष सक्रिय असतात.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘सेनेचं मानसिक संतुलन बिघडलंय’; चित्रा वाघ भडकल्या

  ‘आमदारांना मोफत घर मिळणार नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

  “…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron BA.2, वेळीच व्हा सावध!

‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा